नवी दिल्ली : माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर त्यांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचं सांगत ट्विट डिलिटही केलं.
I am relieved if that is so. I received this from what I thought was a reliable source: “पूर्व लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन जी हमारे बीच नहीं रहीं.
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें.?” Happy to retract & appalled that anyone would make up such news. https://t.co/3c8pDGaBRv— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
नवीन ट्विट करत थरूर यांनी म्हटलं की, मी आधीचं ट्विट डिलिट केलं आहे. काही लोकांकडून अशा प्रकारच्या बातम्या सांगितल्या जातात याचं आश्चर्य वाटतं. सुमित्रा महाजन यांना दीर्घायु लाभो आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना.
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं आहे. देव त्यांना दिर्घायुष्य देवो अशी प्रार्थनाही केली. याच ट्विटला रिप्लाय देताना थरुर यांनी आधीचं ट्विट डिलिट केल्याचं सांगितलं.
ताई एक दम स्वस्थ है । भगवान उन्हें लम्बी उमर दे । https://t.co/bQQMp9BqUv
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) April 22, 2021




