Uday Samant

उदय सामंत यांची मोठी घोषणा, तेराही विद्यापीठांच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन

महाराष्ट्र शैक्षणिक

मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उदय सामंत यांनी सांगितलं कि, “आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. परंतु आता ऊर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवाय चीही परिक्षा ऑनलाईन असेल.

पुढे बोलताना उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झाली. ही भरती कोविड संकट कमी झाल्यावर होईल, प्राध्यापक भरती होणार नाही, अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत