नगर : माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर टेस्ट केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आहे आहेत. पाचपुते यांना कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या ते श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील घरी क्वॉरंटाईन आहेत.
पाचपुते यांनी म्हटले आहे, अखेर ‘कोरोना’ने मला गाठलेच ! विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मला कोणतीही लक्षणे नसून तब्बेत अगदी ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी… आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशिर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.
पाचपुते स्वतःच्या निवासस्थानी क्वारंटाईन झाले आहेत. त्यांंना कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अखेर ‘कोरोना’ने मला गाठलेच !
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मला कोणतीही लक्षणे नसून तब्बेत अगदी ठणठणीत आहे.
गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी…
(१/२) pic.twitter.com/B7kTLOFxuP— Babanrao Pachpute (@Babanrao5pute) December 13, 2020