buddhist monk killeda himself

धक्कादायक! बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिक्खूने दिला स्वत:चाच बळी..

क्राईम ग्लोबल

बँकॉक:  थायलंडमध्ये थम्माकोर्न वांगप्रीचा असे नाव असलेल्या बौद्ध भिक्खूने स्वत:चे मुंडके कापून बळी दिला.  ते ६८ वर्षांचे होते.  उच्च अध्यात्मिक रुपात पुर्नजन्म घेण्यासाठी स्वत:चा स्वत: त्याग करणे हे सर्वोच्चपणाचे लक्षण असून नव्या जीवनात अध्यात्माच्या नव्या स्तरावर पोहचण्यासाठी आणि निर्वाणासाठी संधी मिळेल असा त्यांचा दावा होता. मागील पाच वर्षांपासून या विचित्र बलिदानाची तयारी करत होते, असे म्हटले जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

थम्माकोर्न वांगप्रीचा हे मागील ११ वर्षापासून उत्तर-पूर्व थायलंडमधील एका विहारात सेवा करत होते. त्यांचे पार्थिव शरीर सर्वात पहिल्यांदा त्याचा पुतण्या बुनचर्ड बुनरोड यांनी पाहिला. बुनरोड यांना वांगप्रीचा यांचे एक पत्रदेखील मिळाले. त्या पत्रानुसार, भगवान बुद्ध यांना आपले शरीर आणि आत्मा समर्पित करण्याची इच्छा असल्याचे म्हटले. असे केल्यामुळे भगवान बुद्ध पुढील जन्मात एक उच्च अध्यात्मिक रुपात जगात पुन्हा पाठवतील. मागील पाच वर्षांपासून याची तयारी करत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले.

थम्माकोर्न वांगप्रीचा यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आपण लवकरच या विहारातील सेवा बंद करणार असल्याचे याथम्माकोर्न वांगप्रीचा यांनी अन्य बौद्ध भिक्खूंना सांगितले होते. मात्र, नेमकं काय करणार आहोत याची काहीही माहिती दिली नव्हती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत