मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.
किशोर नंदलास्कर यांचे नातू अनीश म्हटले कि, माझ्या आजोबांना बुधवारी ठाणे येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्याची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली होती. दुपारी १२.३० च्या दरम्यान त्यांनी कोविड सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला.
अनीश पुढे म्हटले कि, कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याला श्वास घेण्यास आणि बोलण्यात त्रास होत होता. त्याच्या ऑक्सिजनची पातळीही लक्षणीय घटली होती.
किशोर नांदलस्कर यांनी वास्तव सिनेमात दीड फुट्याच्या बापाची साकरलेली भूमिका असो, वा गोविंदाच्या जिस देश में गंगा रहता है मधील सन्नाटा असो या भूमिका गाजवल्या. मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतचं वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.
किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपणपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांना बालपणापासूनच होती.




