No ban on proposed films on late actor Sushant Singh Rajput's life: Delhi HC

“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

मनोरंजन

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. एप्रिल महिन्यात सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुशांतच्या वडिलांनी युक्तिवाद केला होता की सुशांतच्या खाजगी जीवनाचे कोणतेही प्रकाशन, उत्पादन किंवा चित्रण हा गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे निर्लज्जपणे आणि हेतुपुरस्सर केलेले उल्लंघन आहे. हे त्याच्या कायदेशीर वारसांच्या पूर्वपरवानगीशिवाय केले जाऊ शकत नाही. या याचिकेत असेही म्हटले होते की, सुशांतचे वैयक्तिक जीवन दर्शविणारा कोणताही चित्रपट त्याच्या मृत्यूशी संबंधित चौकशीवर, साक्षीदारांवर प्रभाव पाडू शकतो. तसेच यामुळे दिवंगत अभिनेता सुशांतबद्दलची लोकांची धारणा बदलेल.

कृष्ण किशोर सिंह यांनी “न्याय: द जस्टीस”, “सुसाईड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट” आणि शशांक या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. कृष्ण किशोर सिंह म्हणाले कि, “बरेच लोक सुशांतच्या मृत्यूचा प्रसिद्धी मिळवण्याची संधी म्हणून वापर करत असून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या किंमतीवर वेगवेगळ्या कथा बनवत आहेत.” परंतु, आता दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे आणि “न्याय: द जस्टीस” या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर आधारित ‘न्याय : द जस्टिस’ सिनेमाचा टिझर रिलीज

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत