guidelines issued for treatment of corona infected children

लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना

कोरोना देश

मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, कोरोनाबाधित मुलांना अँटीव्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. या गाईडलाइन्समध्ये लहान मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. तसेच कोरोनाबाधित मुलांवर उपचार करताना त्यांना स्टिरॉईड्स देणं टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयानं जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट केलं आहे की, आवश्यकतेनुसार केवळ गंभीर रुग्णांनाच स्टिरॉइड देण्यात यावं.

  • मुलांच्या हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांना 6 मिनिटांसाठी फिरण्यास सांगावं. यादरम्यान, त्यांचं सॅच्युरेशन 94 हून कमी आलं, तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं निष्पन्न होईल. या आधारावर मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
  • ज्या मुलांना अस्थमा आहे. त्यांच्यासाठी या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही,
  • जर एखाद्या रुग्णास कोरोनाची तीव्र लक्षणं आढळून आली तर अजिबात उशीर न करता ऑक्सिजन थेरपी सुरु केली जावी.
  • सामान्य रूग्णांसाठी अँटीमाइक्रोबियल्स वापरण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना आवश्यक असल्यास ही औषधे दिली जाऊ शकतात.
  • कोणतीही लक्षणे नसलेल्या मुलांना कोणतेही औषध न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • मास्कचा वापर करावा आणि पौष्टिक अन्न खाण्यास सांगितले आहे.
  • मुलांना ताप आणि खोकला असल्यास पॅरासिटामोल गोळ्या देता येतील आणि कोमट पाण्याने गुळण्या करण्यास सांगितले आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत