the new strain of corona found in Maharashtra being more dangerous

चिंताजनक रेकॉर्ड! देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद..

कोरोना देश

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (९ जून) ९४ हजार ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचा आकडा कमी झाला असला तरी त्या तुलनेत २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. कोरोनामुळे एक दिवसात ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद ठरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सलग तिसऱ्या दिवशी भारतात एक लाखांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे.

  • देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ वर पोहचली आहे.
  • आतापर्यंत २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  • सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहचली आहे.

लसीकरण :
देशात आतापर्यंत एकूण २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत