दोन पिल्लांनी खेळता-खेळता एक पोते फाडले. मालकाने जेव्हा हे बघितले, तेव्हा त्याने पिलांना रागवायला सुरुवात केली. या पिल्लांची आई थोड्या अंतरावर बसून हे सगळं बघत होती. ही आपल्या पिल्लांची चुक असल्याचे तिला समजले, त्यामुळे मालकाचे रागावणे ती निमूटपणे ऐकत होती. परंतु, जेंव्हा मालक पिल्लांना शिक्षा करावी म्हणून चप्पल काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या पिल्लांची आई धावत येते आणि मालकाला पिल्लांना मारण्यापासून रोखते.
— थोडक्यात घडामोडी : MARATHI NEWS – मराठी बातम्या (@thodkyaatnews) June 10, 2021