malad building collapse heavy rains

मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू  झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आसपासच्या लोकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही जणांना ढिगाऱ्याखालून काढलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेस्क्यू करण्यात आलेल्यांमध्ये तीन लहान मुलं, तीन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश होता. दरम्यान, या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. येथील रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

दुर्घटनेत जखमी झालेल्या काहींना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत