भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले कि, कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. भाजपही त्यांना गंभीरपणे घेत नाही, असा टोला परब यांनी लगावला. तसेच भाजपनं सध्या कशावरच राजकारण करू नये, असंही शिवसेनेचे नेते परब यांनी म्हटलं आहे.