Rains will increase again in the state; Heavy to very heavy rains forecast for 11 districts
महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; ११ जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात […]

Heavy rains likely in the state, rainfall to increase between September 26 and 28
महाराष्ट्र मुंबई

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान पावसात वाढ

मुंबई : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी […]

Maharashtra Heavy Rain Flood Rescue Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज व उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर; […]

27 thousand 797 cusecs discharge from Veer Dam in Satara district; Alert issued
महाराष्ट्र रत्नागिरी

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]

Pune: Tree Falls in Panchavati Area; Vehicles Trapped, One Student Injured
पुणे महाराष्ट्र

पुणे : पंचवटी परिसरात झाड कोसळले; वाहने अडकली, एक विद्यार्थिनी जखमी

पुणे : पुणे शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाषाणमधील पंचवटी परिसरातही परिणाम दिसून आला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या भागात झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीजवळ घडली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने […]

2,000 cusecs released from Khadakwasla dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबई : खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे […]

Heavy rains in various parts of the state: Administration should remain alert and carry out relief work, says Deputy Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या. […]

पुणे महाराष्ट्र

पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढण्याचा आयआयटीएमचा इशारा

पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM) संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीवर आणि शहरीकरणामुळे होणाऱ्या हवामानातील बदलांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, “अलिकडच्या काही वर्षांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अल्पावधीतच मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे पूर येणे आणि भूस्खलन होते, असे निदर्शनास आले आहे. […]

Prime Minister Narendra Modi
पुणे महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी होणारा पुणे दौरा शहरातील मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) सूत्रांनी याबाबत पुष्टी केली असून पुण्यात अतिवृष्टीच्या अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. शहरातील इतर विकासकामांसह पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार होते. मात्र, पुणे आणि आजूबाजूच्या भागाला बुधवारपासून मुसळधार पावसाने झोडपून […]