राजस्थान सरकारने अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटाक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केलं कि, “फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून करोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, राज्यात फटक्यांची विक्री आणि आतिषबाजीवर बंदी घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली व धूर सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना साथीच्या या कठीण काळात लोकांच्या जीवाचे रक्षण करणे सरकारसाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
कोरोना महामारी के इस चुनौतीपूर्ण समय में प्रदेशवासियों की जीवन की रक्षा सरकार के लिए सर्वोपरि है।
निवास पर प्रदेश में कोविड-19 संक्रमण की स्थिति, ‘नो मास्क-नो एंट्री’ तथा ‘शुद्ध के लिए युद्ध’ अभियान की समीक्षा की।
बैठक में अनलॉक-6 की गाइडलाइन पर भी चर्चा की और दिशा-निर्देश भी दिए— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 1, 2020