जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.
”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाइन असणार आहे व घरूनच काम करणार आहे.”
“आपण सर्वांनी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण कोरोना संसर्गाची साखळी तोडू शकू व कोरोनावर मात करू शकणार आहोत. तसेच, यामुळे आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत”, असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
It is critically important that we all comply with health guidance. This is how we will break chains of #COVID19 transmission, suppress the virus, and protect health systems.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 1, 2020