the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना देश

येत्या २-३ दिवसांत कोरोनाचा संसर्ग पोहोचणार शिगेला..

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढून ३.८६ लाखांवर गेली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात ऑक्सिजन, औषधं आणि उपचारासाठी आवश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अनेक देशांनी भारताला मदतही पाठवली आहे. मात्र, देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण पडत असून आरोग्यसेवा अपुऱ्या पडत आहेत.

देशात कोरोना संसर्गासंदर्भात शास्त्रज्ञांची एक सल्लागार टीम नेमण्यात आली असून त्याचे प्रमुख एम. विद्यासागर म्हणाले कि, “देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान कोरोनाचा संसर्ग शिगेला (पीक) जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल आणि स्थिती नियंत्रणात असेल. आपण काळजी घेतल्यास दिवसेंदिवस ही संख्या कमी होईल. मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आताच करावं लागेल. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत