अबू धाबी : बेंगळूरु आणि दिल्ली यांच्यात आज होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीत विजयी प्ले-ऑफ आपले स्थान पक्के करेल ,संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कारण हरणाऱ्या संघाचा बाद फेरीचा मार्ग बिकट होऊ शकेल. परिणामी पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल किंवा बिकट होईल.या
आयपीएल’च्या पूर्वार्धात दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या बेंगळूरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी मागील अनुक्रमे चार आणि तीन सामने गमावले आहेत. त्यामुळेच आजच्या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. सलामीच्या स्थानांसाठीचे अस्थर्य ही दिल्लीची प्रमुख चिंता आहे. शिखर धवनला पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही तोलामोलाची साथ देऊ शकलेले नाही. धवनने दोन सलग शतकांनिशी सूर गवसल्याची ग्वाही दिली, पण मागील तीन सामन्यांत तो अनुक्रमे ०, ० आणि ६ धावांवर झगडताना आढळला आहे.
मजबूत बाजू :
- दिल्ली : धवन, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. रबाडा भेदक मारा करण्यास सक्षम.
- बँगलोर : कोहली, डिव्हिलियर्स यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. फिरकीपटू चहल व वाॅशिंग्टन सुंदर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम.
कमजोर बाजू
- दिल्ली : नियमित सलामी जोडीचा अभाव. पृथ्वी शॉ व अजिंक्य राहणे यांनी धवनसोबत सलामीला जोडी बनविली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. धवन गेल्या तीन सामन्यात अपयशी. मधली फळीही विशेष यशस्वी ठरली नाही.
- बँगलोर : कोहली व डिव्हिलियर्स गेल्या दोन लढतींमध्ये अपयशी.