मुंबई : अभिनेता सुबोधच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुबोध छोट्या पडद्यावर परततोय. तुला पाहते रे या मालिकेनंतर सुबोध ब-याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दिसला नाही. मात्र 11 नोव्हेंबरपासून त्याची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून चंद्र आहे साक्षीला हे या मालिकेचे नाव आहे. सुबोधने मालिकेचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यासह त्याने लिहिले, मालिकांशी जोडलेली नाळ कधी तुटली नाही, पुन्हा एका नव्या रुपात तुमच्या समोर येतोय, #चंद्रआहेसाक्षीला, लवकरच.’
नव्या मालिकेविषयी आणि सुबोधच्या कमबॅकविषयी निखिल साने म्हणतात, सुरुवात झाली एका चित्रपटाने ‘आणि डॅा. काशिनाथ घाणेकर’… मग नाटक ‘अश्रुंची झाली फुले’ आणि आता नवी मालिका! या सगळ्यातील महत्वाचा, समान धागा म्हणजे सुबोध भावे! आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर एका दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून सुबोधचे पदार्पण होत आहे. येत्या दिवाळीच्या शुभमुहुर्तावर या नव्याकोऱ्या मालिकेचे आगमन होत आहे. सुबोध.. या सर्व प्रवासासाठी तुझे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा!
View this post on Instagram
चंद्राच्या साक्षीने घेऊन येत आहोत एक नवी मालिका #ChandraAheSakshila लवकरच फक्त #ColorsMarathi वर.
काही दिवसांपूर्वीच सुबोधने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पाठमो-या व्यक्तीचे पोस्टर शेअर केले होते. त्यात पार्श्वभूमीवर चंद्र होता. एक ऑफलाईन धक्का, असे कॅप्शन सुबोधने या पोस्टला दिले होते. त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. पण आता हि नवी मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ कलर्स मराठी वाहिनीवर ११ नोव्हेंबर सुरु होणार आहे.