Kolkata Knight Riders
क्रीडा

कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात

IPL 2020, KKR vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 131 रन्स केले . कोलकाता नाईट रायडर्सकडून पॅट कमिन्स याने जबरदस्त बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये 34 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. शिवम मावी याने चार ओव्हर्समध्ये 15 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती याने चार ओव्हर्समध्ये 20 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर कमलेश नागरकोट्टी याने एक विकेट घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 191 रन्स केले आणि राजस्थान समोर विजयासाठी 192 रन्सचं आव्हान दिलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमकडून ईऑन मॉर्गन याने जबरदस्त खेळी खेळली. मॉर्गन याने 35 बॉल्समध्ये नॉट आऊट राहत 68 रन्स केले. राहुल त्रिपाठीने 39 रन्स केले. शुभमन गिल याने 36 रन्स केले. आंद्रे रसेल याने 25 रन्स तर पॅट कमिन्स याने 15 रन्स केले.

राजस्थान रॉयल्सच्या टीमकडून राहुल तेवतिया याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. राहुल तेवतिया याने चार ओव्हर्समध्ये 25 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. कार्तिक त्यागी याने चार ओव्हर्समध्ये 36 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

कोलकाताने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. ओपनर बॅट्समन रॉबिन उथप्पा अवघ्या सहा रन्सवर माघारी परतला. त्यानंतर बेन स्टोक्स हा 18 रन्स करुन आऊट झाला. त्यापाठोपाठ स्टिव्ह स्मिथ चार रन्स तर संजू सॅमसन एक रन करुन आऊट झाला. मग आलेल्या जॉस बटलरने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बटलर सुद्धा 35 रन्सवर आऊट झाला. रियान पराग शून्यावर आऊट झाला. राहुल तेवतिया याने 31 रन्स, जोफ्रा आर्चरने सहा रन्स केले. श्रेयस गोपाळ याने नॉट आऊट राहत 23 रन्स केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत