शारजाहहून भारतात लखनौत येणाऱ्या भारतीय विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसलेल्या एका प्रवाशाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. या व्यक्तीला वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं नाही.
कराचीच्या जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान इंडिगो एअरलाइन्सचे विमान आहे. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पायलटला इमरजेंसी लँडिंग करावी लागली. वैमानिकाने परिस्थितीची माहिती पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला देऊन विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता एटीसीने वैमानिकाला खाली उतरण्यास परवानगी दिली. परंतु, उतरल्यानंतर प्राथमिक उपचार करण्यापूर्वीच या प्रवाशाचा मृत्यू झाला होता.