मुंबई उच्च न्यायालयाने BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यूज चॅनेल्सच्या कथित टीआरपी स्कॅमप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात दासगुप्ता यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. परंतु, त्यांच्या भारताच्या बाहेर जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
24 डिसेंबर रोजी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. दासगुप्ता यांच्यावर काही टीव्ही चॅनेलच्या अधिकाऱ्यांसह चॅनलच्या रेटिंग्समध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.