West Bengal Goods Train Ramp Into Kanchenjunga Express Several Injured
देश

मोठा अपघात! मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक; ५ जणांचा मृत्यू, २५ जखमी

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले.

दरम्यान, या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी असल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत