नवी दिल्ली : देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने यानिमित्ताने मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत देशभरात ताजमहाल, कुतुबमिनार आणि लाल किल्ला यासारख्या सर्व स्मारके, संग्रहालयांमध्ये मोफत प्रवेश असेल.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशातील जनतेला स्वातंत्र्याच्या सणाशी जोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जी किशन रेड्डी यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या आदेशाबाबत ट्विट केले आणि लिहिले, ‘स्वातंत्र्य आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, 5 ते 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत देशभरातील सर्व संरक्षित स्मारके / स्थळांवर पर्यटकांसाठी प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. ASI च्या स्मारक-II चे संचालक डॉ एन के पाठक यांनी हा आदेश जारी केला आहे.
???? ????? ?? ??? ????????? (?????? ?-??):
As part of ‘Azadi ka #AmritMahotsav‘ and 75th I-Day celebrations, @ASIGoI has made Entry Free for the visitors/tourists to all its protected monuments/sites across the country,
from 5th -15th August, 2022 pic.twitter.com/NFuTDdCBVw— G Kishan Reddy (@kishanreddybjp) August 3, 2022
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमही सुरू केली आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आले आहे.




