BJP remain in Madhya Pradesh by-election results

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप कायम राहणार की सत्तापालट होणार?

देश

मध्य प्रदेशातील २८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. २८ जागांसाठी तब्बल ३५५ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. एकूण २८ जागांपैंकी १९ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत तर ८ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर बसपा उमेदवार आघाडीवर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंधांता मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून या जागेवर भाजपचे उमेदवार नारायण पटेल यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यांनी काँग्रेसच्या उत्तमपाल सिंह यांना २२,१२९ मतांच्या मोठ्या फरकानं पछाडलं आहे.

मध्य प्रदेश विधानसभेत २३० जागा आहेत. भाजपकडे सध्या १०७ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ८७ आहेत. बहुजन समाज पक्षाचे २ आहेत. समाजवादी पक्षाचे १ आणि ४ अपक्ष आहेत. २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत २२ जागा या ज्योतिरादित्य समर्थक आमदारांनी कॉंग्रेस सोडल्याने रिक्त झाल्या होत्या. यामुळे राज्यातील काँग्रेसचे कमलनाथ कोसळले. आणि भाजपचे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. यानंतर काँग्रेसच्या आणखी ३ आमदारांनी पक्ष सोडला. तर कॉंग्रेसच्या २ आणि भाजपच्या एका आमदाराच्या निधनाने आणखी ३ जागा रिक्त झाल्या.

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप कायम राहणार की पुन्हा जनता सत्तापालट घडवून आणणार आणि कमलनाथ यांना सत्तास्थापनेसाठी वाव मिळणार? याचा निकाल जाहीर होऊ शकतो. आपणच सर्व जागा जिंकणार, असा दावा भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी केला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात भाजपला आपले सरकार वाचवण्यात यश येईल, असं दिसून येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत