बेंगळुरू : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज (बुधवार) दुपारी 1 वाजता बेंगळुरू येथील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. कंपनीने जारी केलेल्या अधिकृत माहितीमध्ये असे म्हटले आहे की, उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाले. ही माहिती देताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वांनी प्रार्थना करावी.
We extend our deepest sympathies to his family and friends. Last respect can be paid at Hebbal Crematorium, Bengaluru, on 30th November 2022 at 1pm. [2/2] pic.twitter.com/2XuhErUnzD
— Toyota India (@Toyota_India) November 29, 2022
विक्रम किर्लोस्कर यांनी ‘एमआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांनाच जातं.




