मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत यूपीतील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. 40 जखमींपैकी 20 जणांना प्रयागराज (यूपी) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उर्वरित रुग्णांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेली बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व लोक यूपीचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिराची आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रीवा, मध्यप्रदेशमधील रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि याबाबत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृत यूपी रहिवाशांचे मृतदेह राज्यात नेण्याबाबत चर्चा झाली. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये दिले जातील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सरकार प्रवाशांचे पार्थिव प्रयागराजला पोहोचवेल.
मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी से घायलों के समुचित उपचार व उत्तर प्रदेश निवासी दिवंगतों के पार्थिव शरीर को प्रदेश तक पहुंचाने हेतु वार्ता हुई है।
प्रदेश निवासी दिवंगतों के परिजनों को ₹02-02 लाख व गंभीर घायलों को ₹50-50 हजार सहायता राशि प्रदान करने हेतु निर्देश दिए हैं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 22, 2022
दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाताना अपघात
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सोहागी पहाड येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेश-उत्तर प्रदेशच्या सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर शुक्रवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश मजूर हे दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच रेवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठ्या कष्टाने बाहेर काढले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.