Salman Khan down with dengue, Karan Johar takes over Bigg Boss

सलमान खानला झाला डेंग्यू, करण जोहरने घेतला बिग बॉसचा ताबा

मनोरंजन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या डेंग्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे आता सलमान खान बिग बॉस 16 मध्ये काही आठवडे दिसणार नाही. आजकाल सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगसोबत बिग बॉस 16 चा वीकेंड का वार होस्ट करायचा, पण आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते होणार नाही. सध्या तरी प्रेक्षकांना सलमान खानशिवाय वीकेंड का वार पाहावा लागेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘बॉलिवूड हंगामा’मध्ये नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तो त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंगही करत होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहणार आहे. यासोबतच तो बिग बॉसच्या सेटपासूनही दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत, आता चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की जर सलमान खान शो होस्ट करत नसेल तर कोणता स्टार शो होस्ट करेल, तर हे जाणून घेऊया.

करण जोहर बिग बॉस होस्ट करणार
सलमान खानला डेंग्यू झाला आहे, त्यामुळे करण जोहर ‘वीकेंड का वार’ होस्ट करणार आहे. त्याच्याशी संबंधित काही व्हिडिओ देखील समोर येत आहेत, ज्यामध्ये करण कुटुंबातील सदस्यांना फटकारताना दिसत आहे. करणने गेल्या वर्षी बिग बॉस ओटीटीमधून पदार्पण केले होते आणि आता तो टीव्हीवरील बिग बॉसचा होस्ट बनला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत