Cargo train drives through flames after crashing into fuel truck in central Mexico

बर्निंग ट्रेनचा थरार! इंधनाच्या टँकरला धडकल्यानंतर वेगाने धावणाऱ्या ट्रेनला भीषण आग, पहा Video…

ग्लोबल

मेक्सिको : मेक्सिकोतील एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेन एका आगीच्या गोळ्याप्रमाणे वेगाने धावत आहे आणि ते पाहून लोकांची तारांबळ उडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्य मेक्सिकोमध्ये एक इंधनाचा टँकर ट्रेनला धडकल्यानंतर ट्रेनला आग लागल्याची घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेलाचा टँकर एका रेल्वेमार्गाच्या ओव्हरपासवरून जात असताना तेथून निघालेली ट्रेन टँकरला धडकली आणि ट्रेनला आग लागली. ट्रेनचा वेग एवढा होता की, रुळांवर पसरलेली आग ट्रेनच्या अनेक बोगींमध्ये पसरली, त्यामुळे हा परिसर धुराच्या लोटाने व्यापला गेला आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ट्रेनला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टँकर ओव्हरपासवर आदळल्यानंतर जवळच्या निवासी भागात आग लागल्याने 800 ते 1,000 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे अग्वास्कॅलिएंट्सचे अग्निशमन प्रमुख मिगुएल मुरिलो यांनी सांगितले. आजूबाजूच्या घरांतून बारा जणांना वाचवण्यात आले. एका व्यक्तीला धुरात श्वास घेतल्याने थोडा त्रास झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत