Court Extends Shiv Sena MP Sanjay Raut's ED Custody Till Aug 8

संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच! न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ते सध्या ईडी कोठडीत आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. सुरुवातीपासूनच राऊतांचा या घोटाळ्याशी कसलाही संबंध नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलाय. तर राऊत हेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कसे आहेत, हे ईडीचे वकिल कोर्टाला पटवून देत आहेत.

दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी राऊतांनी विशेष पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज केला. राऊतांच्या जामीन अर्जावर ११ ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी 17 ऑक्टोबरला घेण्याचे सांगितले होते. पुन्हा एक दिवसाने सुनावणी पुढे ढकलत १८ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाली. पण ईडीच्या वकिलांच्या युक्तिवादाची नोंद घेत न्यायालयाने राऊतांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत