Marathi Actor-Director Ranjit Patil Passes Away at 42 Due to Heart Attack
मनोरंजन

अभिनेता-दिग्दर्शक रणजित पाटील यांचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

मुंबई : मराठी सिनेइंडस्ट्री आणि रंगभूमीवर आपल्या शांत, अभ्यासू कामामुळे ओळख निर्माण करणारे अभिनेता व दिग्दर्शक रणजित पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी रणजित पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

रणजित पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई-वडील तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही रणजित पाटील यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती. मराठी रंगभूमीशी त्यांचे घट्ट नाते होते. प्रायोगिक रंगभूमी आणि एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी अनेक तरुण कलाकार घडवले.

अलीकडेच प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. या नाटकाच्या यशामागे रणजित पाटील यांचा मोठा वाटा होता. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपट तसेच ‘काळे धंदे’ या लोकप्रिय वेबसीरिजमध्येही प्रभावी भूमिका साकारल्या होत्या.

रणजित पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “एक अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू दिग्दर्शक आपल्यातून गेला,” अशा शब्दांत सहकलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत