Raju Srivastava suffered heart attack, admitted to AIIMS Hospital in Delhi
मनोरंजन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका, एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोनदा सीपीआर देण्यात आल्याची माहिती आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ते ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. यावेळी धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते खाली पडले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ते शुद्धीत आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या टीमने सांगितलं आहे.

कॉमेडियनबद्दलच्या या दु:खद बातमीने चाहते अस्वस्थ झाले आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. वर्षानुवर्षे राजू श्रीवास्तव आपल्या कॉमेडीने लोकांना हसवत आहेत. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचे होते आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्णही केले. राजूने आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत