मुंबई : मराठी सिनेइंडस्ट्री आणि रंगभूमीवर आपल्या शांत, अभ्यासू कामामुळे ओळख निर्माण करणारे अभिनेता व दिग्दर्शक रणजित पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी रणजित पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना […]
टॅग: heart attack
गायक आणि संगीतकार पंडित संजय राम मराठे यांचे निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ठाणे : शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे १६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध संगीतकार […]
ब्रेकिंग! सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती तिच्या काही कर्मचाऱ्यांसह गोव्याला गेली होती. ती 42 वर्षांची होती. तिला काल रात्री हृदयविकाराचा झटका आला. तिने तिच्या कर्मचाऱ्यांकडे तिला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, मेंदूलाही हानी पोहोचल्याची डॉक्टरांची माहिती
नवी दिल्ली : राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसांनंतरही ते बेशुद्ध आहेत आणि अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूचे प्रचंड नुकसान झाले आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला मोठा फटका बसला. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी […]
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका, एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोनदा सीपीआर देण्यात आल्याची माहिती आहे. राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ते ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. यावेळी धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते […]
अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील रुग्णालयात दाखल
चेन्नई : अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची ७ जुलै रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयाने अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केलेले नाहीत, तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वनच्या टीझर लॉन्चला उपस्थित राहणार […]
जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचे निधन, फाईट सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका आणि…
म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली. “आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप […]
मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मूळ कोट्टायममधील कुमारनेल्लूर येथील रहिवासी असलेल्या प्रदीप यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये काम केले […]
दुःखद! अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन, चार दिवसांपूर्वीच म्हणाले होते ‘जगणं सोडू नका’…
मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. २००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं […]
अभिनेते पुनीत राजकुमार यांचे निधन, रुग्णालयाच्या बाहेर चाहत्यांचा आक्रोश
सुप्रसिद्ध कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले […]









