मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं.
२००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या नऊ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कागर: लाइफ ऑन द एज’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (२०१३), रंगदारी (२०१२), ये दिल्लगी (२०१३) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते.
इंस्टाग्रामवरील त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये अमिताभ दयाल यांनी हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी कधीही हार न मानण्याचा प्रेरक संदेश दिला होता. त्यांनी म्हटले होते, “कधीही हार मानू नका… देव तुम्हाला सर्वोत्तम देण्याची वाट पाहत आहे, लढत राहा. जीवन जगणं सोडू नका…”
View this post on Instagram
अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांना शिवम आणि अमृता हे दोन मुलं आहेत. मृणालिनी पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.




