बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यांच्या जवळच्या मित्रानेच याबाबत माहिती दिली होती. मात्र, काही वेळाने त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं. निशिकांत कामत अद्यापही व्हेंटिलेटरवर असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख याने देखील ट्विट करून म्हटलं आहे की, ‘निशिकांत कामत व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. तो अजूनही जिवंत आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करा’
Nishikant kamat is on ventilator support. He is still alive & fighting. Let’s pray for him.
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
निशिकांत कामत काही दिवसांपासून लिव्हर सिरोसिस या आजाराशी लढा देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे.




