Akshay Kumar's mother dies

अक्षय कुमारच्या आईचे निधन

मनोरंजन

मुंबई : अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अक्षयने स्वतः ट्विट करून त्याच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अक्षयने ट्विट करत म्हटले कि, “माझी आई माझा कणा होती. मला आज असे दुःख वाटत आहे, जे मी सहन करू शकत नाही. माझी आई अरुणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. आता ती माझ्या वडिलांना दुसऱ्या जगात भेटेल. या कठीण प्रसंगी तिच्यासाठी चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनेचा मी आदर करतो. ओम शांती.”

आपल्या मुलाच्या 54 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अरुणा भाटियाने अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारचा वाढदिवस 9 सप्टेंबरला येतो.

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती चिंताजनक, अक्षय शूटिंग सोडून लंडनहून परतला

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत