Divorce of Shikhar Dhawan and Ayesha Mukherjee

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट, लिहिली भावनिक पोस्ट

क्रीडा

नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने घटस्फोट घेतल्याची माहिती मिळाली आहे. शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. दोनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर काय वाटतं, याबाबत तिने लिहिलं आहे. आयशाने शिखरसोबतचे आपले फोटोही डिलीट केले आहेत. शिखर आणि आयशा यांनी 2012 साली लग्न केलं होतं. आयशाने त्याअगोदरही पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिखर धवनने 2012 साली आपल्यापेक्षा 10 वर्ष मोठ्या असलेल्या आयशाशी लग्न केलं. यावेळी शिखरच्या कुटुंबाने त्याची साथ दिली. 2014 साली आयशाने एका मुलाला जन्म दिला, शिखर आणि आयशा यांच्या मुलाचे नाव जोरावर धवन आहे. तसेच, पहिल्या नवऱ्यापासून आयशाला 2 मुली होत्या. शिखर धवनने याबाबत अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

आयशा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, ‘दोन वेळा घटस्फोट घ्यायच्या आधी घटस्फोट हा शब्द घाणेरडा वाटत होता. खूप काही सिद्ध करायचं होतं. जेव्हा माझं दुसरं लग्न तुटलं तेव्हा हे खूप भीतीदायक होतं. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मला वाटलं मी खूप अपयशी आहे. मी काहीतरी खूप चुकीचं वागत आहे. मला वाटलं जसं मी सगळ्यांची मान खाली झुकवली आणि स्वार्थी वागले. आई-वडिलांना मुलांना कमी दाखवत आहे, असं वाटलं. एवढच नाही तर देवाचाही अपमान केला, असं मला वाटलं.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत