इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये हा संघ ‘पंजाब किंग्ज’ म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.