शारजाह : आयपीएलच्या कालच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाताविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे विराट कोहली चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विराट म्हणाला की, “आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाली होती. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी […]
टॅग: IPL 2021
ऋतुराज गायकवाडची धमाकेदार कामगिरी, ऑरेंज कॅप त्यालाच मिळणार याची चाहत्यांना खात्री
IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले तीन तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडू आहेत. यंदा चेन्नईकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर सर्वांचे लक्ष होते, त्याने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत धमाकेदार कामगिरी केली आहे. ऋतुराज सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. […]
IPL 2021 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मैच
IPL 2021 फेज -2 मधील पहिला क्वालिफायर आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. पहिले दोन स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या दोन संघांमधील सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची […]
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना, दोघांसमोर ‘करो वा मरो’ परिस्थिती
IPL 2021 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचे 12-12 सामन्यांत 10-10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांनाही उर्वरित सामने जिंकणे आणि त्यांचा नेट रन रेट सुधारणे आवश्यक आहे. या हंगामात मुंबई आणि राजस्थान यांच्यातील पहिला सामना 29 एप्रिल रोजी खेळला गेला. मुंबईने तो सामना 7 गडी राखून […]
IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS ? […]
मोठं वक्तव्य! हैदराबादच्या खराब खेळाला डेव्हिड वॉर्नरच जबाबदार – इरफान पठाण
मुंबई : आयपीएलचा 14 च्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. संपूर्ण टीम विजयासाठी संघर्ष करताना दिसली. संघाचा संघनायक डेव्हिड वॉर्नर त्याच्या फॉर्मशी झगडत होता. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे डेव्हिड वॉर्नरला टीकेला सामोरं जावं लागलं. प्रसंगी त्याच्याकडून संघाचं नेतृत्व काढून घेऊन केन विल्यमसनकडे देण्यात आलं. या साऱ्या प्रकारानंतर अनेक दिग्गजांनी […]
‘रस्त्यात कोणी चॉकलेट दिलं तर खाऊ नको आणि..’, सॅम करनचं Meme तूफान व्हायरल
मुंबई : यावर्षी IPL २०२१ स्पर्धा बायो-बबलमध्ये कोरोनाच्या शिरकावामुळे 29 सामन्यानंतर स्थगित करण्यात आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) ऑलराऊंडर सॅम करन याने खूप चांगली कामगिरी केली. मात्र, त्याच्या वयावरून खूप वेळा त्याला ट्रोल करण्यात येतं. IPL २०२१ स्थगित झाले असले, तरी अनेक मिम्स व्हायरल होत असतात. त्यातच आता सॅम करनचा एक फोटो प्रचंड […]
ब्रेकिंग : IPL स्पर्धा स्थगित, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली माहिती
IPL २०२१ : IPL खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर बीसीआय ने (BCCI) IPL स्पर्धा स्थगित केली आहे. केकेआर संघानंतर आता हैदराबाद संघाच्या खेळाडूंनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हैदराबादचा खेळाडू रिद्धिमान सहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने संपूर्ण टीम विलगीकरणात आहे. यापूर्वी केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. दुसरीकडे चेन्नई […]
ब्रेकिंग : रिद्धिमान साहा आणि अमित मिश्रा यांना कोरोनाची लागण, IPL वर कोरोनाचं संकट
IPL २०२१ : रिद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली आहे. हा आयपीएल साठीआणखी एक मोठा धक्का आहे. सनरायझर्स हैदराबादच्या वृध्दिमान साहाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि संपूर्ण सनरायझर्स हैदराबादची टीम कालपासून विलगीकरणात आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकार पीटर लालोर यांनी ट्विटरवरुन ही बातमी उघड केली. BREAKING: Wriddhiman Saha is reported to have tested postive to Covid. — […]
IPL मध्ये कोरोनाचा उद्रेक, आता चेन्नई संघात सापडले तीन कोरोना रुग्ण
नवी दिल्ली : IPL 2021 च्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स […]