RCB team captain needs to be changed

आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय

क्रीडा

शारजाह : आयपीएलच्या कालच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाताविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे विराट कोहली चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विराट म्हणाला की, “आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाली होती. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी आरसीबीचा कर्णधार नसलो तरी संघाबरोबर एक खेळाडू म्हणून नक्कीच कायम असेन.”

आतापर्यंतचा कोलकाताच्या संघाचा युएईमधला रेकॉर्ड आहे की त्यांनी इथे धावांचा पाठलाग करताना एकही सामना गमावलेला नाही. मात्र, केकेआरविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा निर्णय चुकल्याचे पाहायला मिळाले.

विराटने सामन्यादम्यान पंचांशी हुज्जत घातली

आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात कोलकाताचा राहुल त्रिपाठी याच्या पॅडला चेंडू लागला. त्यावेळी आरसीबीच्या संघाने जोरदार अपील केले. पण मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेतला. यावेळी तिसऱ्या पंचांनी राहुलला बादही दिले. पण तरीही कोहली मैदानातील पंचांकडे गेला आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला. चुक सुधारल्यावरही पंचांशी हुज्जत घालणे, याचे समर्थन कोणीही करू शकत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत