IPL २०२१ : IPL खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर बीसीआय ने (BCCI) IPL स्पर्धा स्थगित केली आहे. केकेआर संघानंतर आता हैदराबाद संघाच्या खेळाडूंनाही कोरोनाचा फटका बसला आहे. हैदराबादचा खेळाडू रिद्धिमान सहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने संपूर्ण टीम विलगीकरणात आहे. यापूर्वी केकेआरच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जचे सहाय्यक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयने IPL काही काळ तहकूब करण्याचे ठरवले आहे.
तत्पूर्वी, बीसीसीआयने काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता बऱ्याच संघांमधील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, आम्ही ही स्पर्धा पुन्हा केव्हा घ्यावी, यावर विचार करत आहोत, पण सध्यातरी ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
BREAKING: IPL 2021 has been suspended indefinitely because of COVID-19.
The BCCI will arrange for the “secure and safe passage of all the participants.” pic.twitter.com/Jp3PfX90Xf
— ICC (@ICC) May 4, 2021




