8 lions in Hyderabad zoo test positive for Covid, 1st such case in India

धक्कादायक : हैदराबादमधील ८ सिंहांना कोरोनाची लागण

कोरोना देश

हैदराबाद : हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयातल्या ८ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. सेंटर फॉक सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) २९ एप्रिलला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यांनी RT PCR चाचणीत प्राणिसंग्रहालयातील ८ सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वन्यप्राण्यांची देखभाल करणाऱ्या पशुचिकित्सकांना २४ एप्रिलला या सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यांना भूख न लागणं, नाकातून पाणी येणं आणि कफ झाल्याचे दिसून आलं होतं. या प्राणिसंग्रहालयात १२ सिंह आहेत. ते जवळपास १० वर्षे वयाचे आहेत. या घटनेनंतर नागरिकांसाठी हे प्राणिसंग्रहालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. हे प्राणिसंग्रहालय अतिशय दाट लोकवस्तीत आहे. सिंहांची देखभाल करणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलिकडेच प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सांगितलं आहे कि, हैदराबाद प्राणिसंग्रहालयात असलेल्या 8 एशियाटिक सिंहांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते सिंह विलगीकरणात असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि व्यवस्थित खातपीत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षी ८ वाघ आणि सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच हाँगकाँगमध्ये कुत्री आणि मांजरांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत