Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL मध्ये कोरोनाचा उद्रेक, आता चेन्नई संघात सापडले तीन कोरोना रुग्ण

क्रीडा

नवी दिल्ली : IPL 2021 च्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात कोरोनाचा शिरकाव झालेला बघायला मिळत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात  CSK संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नईच्या संघात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, कासी विश्वनाथ आणि बालाजी हे शनिवारी झालेल्या सामन्याच्या वेळी खेळाडूंसोबत डगआऊटमध्ये उपस्थित होते. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चेन्नई संघाचा सराव देखील बंद ठेवण्यात आला आहे. संघातील बाकी सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत