क्रीडा

एकाच वेळी ब्रेन ट्यूमर आणि करोना व्हायरस या दोघांशी लढा देतोय क्रिकेटपटू…

करोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. ३ ते ४ महिन्यांपासून असलेले बंदही आता शिथिल होत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. काही खेळाडूंना देखील करोनाची लागण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बांग्लादेशचा फिरकी गोलंदाज मुशर्रफ हुसेन याचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आढळला आहे.  गेल्या वर्षी त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले होते. त्यामुळे आता तो एकाच वेळी ट्यूमर आणि करोना व्हायरस या दोघांशी लढत आहे. तो सध्या क्वारंटाइन झाला आहे.

करोना आणि ब्रेन ट्यूमर या दोन्हीवर मात करून हुसैनला पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची इच्छा आहे. याआधी बांगलादेशचे मशर्रफ मुर्तजा, नजमुल इस्लाम आणि नफीस इकबाल यांना जून महिन्यात करोना झाल्याची बातमी आली होती. तर त्याआधी बांगलादेश फुटबॉल संघातील १८ खेळाडूंची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत