KXIP vs RR : युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 99 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि आठ षटकार लगावले. यासह टी -20 क्रिकेटमध्ये गेलने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये गेलने एक हजार षटकारांचा रेकॉर्ड केला आहे. टी -20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे.
गेल राजस्थानविरुद्ध फलंदाजीला आला होता तेव्हा हे लक्ष्य पूर्ण करण्यापासून तो सात षटकारांच्या अंतरावर होता. गेलने तुफानी खेळी करत डावाच्या 19 व्या षटकात कार्तिक त्यागीच्या 5 व्या चेंडूवर कारकिर्दीतील 1000 वा षटकार लगावला. राजस्थानविरुद्धच्या खेळीत गेलने एकूण आठ षटकार ठोकले.
Unacademy Lets Crack It Sixes of the Match award goes to Chris Gayle.@unacademy #LetsCrackIt #Dream11IPL pic.twitter.com/6TosyVSVKy
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
टी -20 क्रिकेटमधील गेलचा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे. कारण या यादीमध्ये किरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डच्या नावावर टी -20 क्रिकेटमध्ये 690 षटकार तर गेलच्या नावावर 1 हजार षटकार आहेत. त्यामुळे गेलचा हा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे.