Successful test of 'Brahmos' cruise missile
देश

सुखोई लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी पंजाबमधून उड्डाण करुन विमान बंगालच्या उपसागरात दाखल झाले. यानंतर चाचणी घेण्यात आली. याआधी तपासणी करण्यासाठी ‘ब्राह्मोस’ घेऊन उडत असलेल्या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारताच्या हवाई सीमेच्या रक्षणासाठी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची स्क्वाड्रन सज्ज झाली आहे. तसेच हवाई दलात ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्र कार्यरत झाले आहे. अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान ‘ब्राह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्रासाठी वापरले जाते. जमिनीवरुन, समुद्रात कारर्यत युद्धनौकेवरुन तसेच लढाऊ विमानातून ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या यशस्वी झाल्या.

ब्राह्मोस या क्रुझ क्षेपणास्त्राद्वारे ४०० किमी लांबच्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करता येतो. एक रॅमजेट सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असल्यामुळे ब्राह्मोस पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमान, तसेच जमीनीवरील मोबाइल लाँचर यावरुन डागता येते. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली आवृत्ती २९० किमी लांबच्या लक्ष्याचा अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम होती. आणखी विकास करुन ब्राह्मोसचा पल्ला वाढवण्यात यश मिळाले आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वातावरणात निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करण्यासाठी सक्षम आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत