मुंबई : राज्यातील सिंधी समाजातील निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे ‘विशेष अभय योजना-२०२५’ अंतर्गत नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे सिंधी निर्वासित बांधवांच्या राज्यातील ३० ठिकाणच्या वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अभय योजना वर्षभरासाठी लागू राहणार आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या […]
टॅग: india
पुण्यात २७ वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार
पुणे : पुण्यात लैंगिक अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूतानमधील एका २७ वर्षीय तरुणीवर सात पुरूषांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही तरुणी २०२० मध्ये कामाच्या शोधात भारतात बोधगया येथे आली. त्यानंतर ती पुण्यात राहायला आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख आरोपींपैकी एक असलेल्या ऋषिकेश नवलेशी झाली होती, ज्याने तिची ओळख त्याचा मित्र […]
महागाईचे चटके! उद्यापासून पेट्रोल-डिझेल महागणार
नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून म्हणजेच 8 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. सध्याची स्थिती पाहता, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.90 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 15.80 रुपये प्रति लिटर […]
पुणे : १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पिठगिरणी कामगाराला अटक
पुणे : एका पीठ गिरणी कामगाराने शाळेत निघालेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली येथे ही घटना घडली असून वाघोली पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २५ मार्च रोजी झालेल्या या गुन्ह्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाघोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, […]
भारताविरुद्ध पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली. ३५ वर्षीय स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, तो कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहील. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून जवळजवळ १५ वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळले, आणि या काळात त्याने अनेक […]
सागरी शक्तीच्या दिशेने भारताची वाटचाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई,दि.१५ निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या नौका […]
भारताचं चंद्रावर मून वॉक! रोव्हरने लँडरमधून बाहेर पडत मारला फेरफटका
बेंगळुरू : चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. आता विक्रम लँडरमधून बाहेर पडणारा प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग झाल्यानंतर काही तासांनंतर चांद्रयान-3 चा हा पुढचा यशस्वी टप्पा आहे. या कामगिरीबद्दल संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून इस्रोचे अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने […]
पंतप्रधान मोदींच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे भारत विश्वासू भागीदार असल्याची जगभरात खात्री
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या अधिकृत राज्य दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्वतंत्र परराष्ट्र धोरणासाठीच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जगाने भारताला विश्वासू भागीदार म्हणून पाहिले आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हिताला महत्त्व देऊन स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे जग भारताला एक विश्वासू […]
‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन, १९ वर्षानंतर भारताला यजमानपद
मुंबई : तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टिमिस्ट एशियन अँड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. गुरुवार 15 डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सन 2003 नंतर […]
हंगर इंडेक्समध्ये भारताची 107 व्या स्थानावर घसरण; शेजारी देशांपेक्षा भारतात जास्त उपासमार
ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ : यावेळी ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच हंगर इंडेक्समध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अगदी नेपाळपेक्षाही भारतात उपासमार जास्त आहे. आकडेवारी सांगते की भारतात उपासमार झपाट्याने वाढली आहे आणि भारताची क्रमवारी आणखी खालावली आहे. भुकेशी संबंधित या क्रमवारीत भारताची आणखी सहा स्थानांनी घसरण झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या क्रमवारीनुसार, भारत […]