Pune: Flour Mill Worker Rapes 10-Year-Old Girl, Arrested
पुणे महाराष्ट्र

पुणे : १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पिठगिरणी कामगाराला अटक

पुणे : एका पीठ गिरणी कामगाराने शाळेत निघालेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली येथे ही घटना घडली असून वाघोली पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २५ मार्च रोजी झालेल्या या गुन्ह्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वाघोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, १० वर्षीय मुलगी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वाघोली परिसरात शाळेत जात असताना गिरणी कामगाराने तिला जेवणाचे आमिष दाखवले. जेवणाचे आमिष दाखवून त्याने तिला त्याच्यासोबत गिरणीत जाण्यास भाग पाडले. त्यानंतर गिरणीत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

स्थानिकांनी मुलीला रस्त्याच्या कोपऱ्यावर रडताना पाहिले आणि त्यांनी तिची चौकशी सुरू केली. तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले.

वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी आणि त्याला मृत्युदंड द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत