Disha Salian death case: Sensational allegations by lawyer Nilesh Ojha, demand for re-investigation
महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, उद्धव ठाकरे पण आरोपी, वकील निलेश ओझांचे सनसनाटी आरोप

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि दावे केले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ओझा म्हणाले कि, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंकडून घडलेल्या गुन्ह्यावर पांघरुन घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासानुसार आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग आहे. याचा तपशील आमच्याकडे आहे, असा गंभीर आरोप ओझांनी केला. ‘आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांचं फोनवरील संभाषण यासाठीचा पुरावा आहेत. समीर खान नावाच्या व्यक्तीची डीए ५० नावाची कंपनी आहे. त्याला ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात एनसीबीने आरोपी केलं होतं. या कंपनीशी दिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे नियमित संपर्कात असतात. आदित्य ठाकरेंचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग समोर आल्यावर एनसीबी आणि समीर वानखेडेंना अटकेची कारवाई करण्यापासून कोणी रोखलं होतं? त्यासाठी किती कोटींची डील झाली होती?, असे सवाल ओझांनी विचारले.

‘दिशा सालियनचा स्टिव्ह पिंटो नावाचा एक मित्र होता. त्यानं काही ट्विट्स केले होते. ७ जून २०२० रोजी एकता कपूरच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीला परमवीर सिंह, सुशांत, दिशा, आदित्य ठाकरे हजर होते. तिची हत्या कशी झाली याच्या काही हिंट त्यानं दिल्या होत्या. तो स्टिव्ह पिंटो त्या दिवसापासून गायब आहे. त्यामुळे या पोस्ट कोणी लिहिल्या, स्टिव्ह पिंटो कुठे आहे. याचाही तपास व्हावा,’ अशी मागणी ओझांनी केली.

या प्रकरणात दिशाच्या कुटुंबियांना ५ वर्षांनी जाग आली का, असा सवाल करणाऱ्यांनाही ओझा यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘११ डिसेंबर २०२३ रोजी सतीश सालियन यांचा जबाब एसआयटीने नोंदवला. त्यात त्यांनी केस रिओपन करण्याची आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता जाग आली म्हणणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे,’ असं ओझा म्हणाले.

तसेच आमची तक्रार खोटी निघाली, तर आम्हाला कठोर शिक्षा द्यावी. आम्हाला फाशी दिली जावी, असंही आम्ही लिहून दिलंय. पण एफआयआर दाखल करुन तपास तर करा. त्यापासून पळ का काढताय. यात काय राजकारण सुरु आहे? छत्रपतींच्या भूमीत अत्याचार पीडित तरुणीच्या वडिलांना न्यायासाठी ५ वर्षे फिरावं लागतंय ही शरमेची बाब आहे, असं ओझा म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत