मुंबई : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने २ हजार २२८ पदे निर्माण […]
टॅग: mumbai high court
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता
मुंबई : मुंबईतील वांद्रे – पूर्व येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी ३ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे शासकीय वसाहतीतील सुमारे ३०.१६ एकरवर उच्च न्यायालयाचे नवीन संकुल उभारले जाणार आहे. याठिकाणी उच्च न्यायालयाचे हायकोर्ट रुम, न्यायाधीशांची दालने आणि […]
उद्या 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते खाली करा, मराठा आंदोलकांना हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय परिसर, चर्चगेट स्थानक, हुतात्मा चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले असून दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज […]
आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, उद्धव ठाकरे पण आरोपी, वकील निलेश ओझांचे सनसनाटी आरोप
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि […]
मेधा किरीट सोमय्यांकडून संजय राऊतांविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला […]
सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 13 जून पर्यंत स्थगिती
मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने 13 जून 2022 पर्यंत स्थगिती दिली. दिवाणी न्यायालयाने मार्च महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना समन्स बजावले होते आणि त्यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे […]
भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला अरुण फरेरा, वरवरा राव, व्हर्नन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपी वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयाच्या डिसेंबर 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि एनजे जमादार यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपींनी दावा केल्यानुसार निकालात कोणतीही तथ्यात्मक त्रुटी नव्हती. न्यायालयाने निर्णय दिला कि, “जामिनासाठीचे अर्ज […]
वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांची छायाचित्रे छापण्यास मनाई करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांचे फोटो छापण्यावर निर्बंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्हीजी बिश्त यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालय असे निर्देश देऊ शकत नाही, असे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा बनवणे किंवा राज्याला कायदा करण्याचे निर्देश देणे हे उच्च न्यायालयांचे काम नाही, असे नमूद […]
राणा दाम्पत्याला मोठा झटका, दुसरी FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला दुसरा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या दोघांविरुद्ध दुसरी एफआयआर आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत नोंदवण्यात आली, म्हणजे […]
लैंगिक गुन्ह्यांतील पीडित बालकांवर पुन्हा -पुन्हा आघात नको, त्यासाठी सर्व न्यायालयांना ‘हे’ निर्देश जारी
मुंबई : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पीडित बालकाची तपासणी करण्यात विलंब झाल्यास त्याचा आरोपींनाच फायदा होईल, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व विशेष पॉक्सो न्यायालयांना बालक/पीडितांचे पुरावे नोंदवण्याबाबत निर्देश जारी करताना असे निरीक्षण नोंदवले. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सांगितले की, जर पीडिताची त्वरीत तपासणी केली गेली, तर पीडित ती घटना घडल्याप्रमाणे ज्वलंतपणे […]










