Salman Khan

सलमान खानला मोठा दिलासा, पत्रकारासोबत गैरवर्तन प्रकरणी समन्सला 13 जून पर्यंत स्थगिती

मनोरंजन

मुंबई : अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये एका पत्रकारासोबत कथित गैरवर्तन प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सलमानला जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने 13 जून 2022 पर्यंत स्थगिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिवाणी न्यायालयाने मार्च महिन्यात सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांना समन्स बजावले होते आणि त्यांना 5 एप्रिल रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 मे पर्यंत समन्सला स्थगिती दिली होती, त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत 13 जून 2022 पर्यंत स्थगिती वाढवण्यात आली. दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 9 मे पर्यंत वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती.

काय आहे प्रकरण?
पत्रकार अशोक पांडे यांनी २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरोधात तक्रार दाखल केली होती. अशोक पांडे आपल्या तक्रारीत म्हणाले की, २०१९ मध्ये ते कॅमेरामनसोबत कुठेतरी जात असताना त्यांना वाटेत सलमान खान सायकल चालवताना दिसला. अभिनेत्याच्या दोन्ही अंगरक्षकांची परवानगी घेतल्यानंतर अशोकने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. ही बाब सलमान खानला समजताच त्याने याला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर सलमान खानच्या अंगरक्षकानेही त्याच्यावर हात उचलला. त्यानंतर सलमान खानने आपल्याला मारहाण करून फोन हिसकावून घेतला आणि धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत