Dia Mirza and Vaibhav Rekhi welcome baby boy Avyaan, born prematurely

अभिनेत्री दिया मिर्झाला पुत्ररत्न, 6 व्या महिन्यातच जन्माला आलं बाळ

मनोरंजन

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं होतं. दिया आणि वैभव यांना मुलगा झाला आहे. त्याचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. दियाच्या बाळाचा जन्म 14 मे रोजीच झाला होता. पण ते बाळ 6 व्या महिन्यातच जन्माला आल्यामुळे प्रिमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आता दियाने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही बातमी दिली. अजूनही आपलं बाळ आयसीयुमध्ये असल्याचंही तिने सांगितलं आहे. दियाने तिच्या मुलाचं नावही जाहीर केलं असून तिच्या मुलाच नाव अव्व्यान आझाद रेखी (Avvyan Azaad Rekhi) ठेवलं आहे. तसेच ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा त्यांना आधार मिळाला त्यांचे ही आभार मानले आहेत.

दरम्यान दियाने पोस्टमध्ये सांगितलं की गर्भवती असताना तिला काही इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. पण डॉक्टरांनी वेळेवर उपचार करत सिझरिंग (C – section) पद्धतीने बाळाला जन्म दिला. त्यामुळे 6 व्या महिन्यातच बाळ जन्माला आलं. दियाने आणखी मोठी पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिया आणि वैभव यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी लग्न केलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत